- नगरसेवक वसंत बोराटे यांचे सोसायटीतील नागरिकांनी मानले आभार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२३) :- गत काही वर्षांपासून मोशीतील एस के गार्डन सोसायटीतील नागरिक सारखी ‘बत्ती गुल’ होत असल्यामुळे हैराण झाले होते. सोसायटीत गेल्या दोन वर्षांपासून विजेची भेडसावणारी ही समस्या नगरसेवक वसंत बोराटे यांनी चुटकी सरशी सोडविली. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
केबल खराब असल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता. शहरी भाग असूनही दहा-दहा तास सारखी वीज जात असल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले होते. शेवटी नगरसेवक वसंत बोराटे यांनी पुढाकर घेतला.
दोनच दिवसात तोडगा काढून नवीन केबल स्वखर्चातून उपलब्ध करून दिली. केबल जोडणीचे काम करून सारखा खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत केला. कामाची हे गती पाहून सोसायटीतील नागरिकांनी नगरसेवक वसंत बोराटे यांचे आभार मानले आहेत.
आमच्या येथे मागील दोन वर्षांपासून एमएसईबीचा पावर सप्लायचा प्रॉब्लेम होता. सोसायटीच्या डीपीमध्ये कालांतराने १ फेज निकामी झाला होता. त्यामुळे दोन फेजवर संपूर्ण लोड आला. कालांतराने आणखी एक फेज निकामी झाला. त्यामुळे एकाच फेजवरून विद्युत पुरवठा होत होता. तीन फेजचा लोड एकाच फेजवर आल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे आम्ही नगरसेवक वसंत बोराटे यांना आमची समस्या सांगितली. त्यांनी दोन वर्षांपासून रखडलेल्या विद्युत पुरवठ्याचा प्रश्न दोनच दिवसात मार्गी लावला.
– मधुकर देशमुख, एस के गार्डन सोसायटीतील नागरिक….वसंतशेठ यांना आमची समस्या सांगताच त्यांनी काही दिवसांतच समस्येचे निवारण केले. त्यामुळे त्यांचे आभार.
– जितेंद्र परदेशी, एस के गार्डन सोसायटीतील नागरिक…

















