- पुणे आणि मुंबई बाजूकडील प्रवाशांसाठी हे आहेत पर्यायी मार्ग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२३) :- सध्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२३ सुरु आहेत. या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२३ मधील भारत विरुद्ध बांग्लादेश क्रिकेट सामना उद्या गुरुवारी (दि. १९) रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडीयमवर होणार आहे.
हा सामना पाहण्याकरीता खाजगी वाहनांनी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येणार असल्याने या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात देहूरोड वाहतूक विभागाकडून वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
- मामूर्डी अंडरपास ( मासूळकर फार्म) कडून कृष्णा चौकाकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग:- लोढाकडुन येणारी वाहने मामुर्डी अंडर पासपासून उजव्या बाजूस वळून बापदेव बुवापासुन कृष्णा चौकाकडे जातील.
- मामूर्डी गावाकडून मामुर्डी अंडरपास (मासुळकर फार्म) बाजुकडे जाण्यास प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग सदर मार्गावरील वाहने मामुर्डी जकात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
- साईनगर भागातील उपलब्ध करुन दिलेल्या पार्किंग नंबर २,३,४,५,६,७,८,२०,११,१२,१३ मधील वाहनांना सामना संपल्यानंतर मामूर्डी अंडरपास बाजुकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग १. सदरची वाहने साईनगर रोड ते सेंट्रल चौक मार्गे इतिस्थळी जातील. मार्ग: २. सदर मार्गावरील वाहने शितळादेवी मामुर्डीहून जकात नाका मार्ग इच्छित स्थळी जातील.
- गहुंजे पूल ते वाय जंक्शनमार्ग स्टेडीयमकडे जाणाऱ्या कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- मुंबईकडून येणाऱ्या व देहूरोड एक्झिटकन एक्सप्रेस लगतच्या सर्व्हिसरोडने स्टेडीयमकडे जाणाऱ्या कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे.
- अ) वाहन पास असलेले व्हीव्हीआयपी व व्हीआयपी यांचेकरीता :
१) मुंबईकडुन येणाऱ्या व्हीव्हीआयपी व व्हीआयपी ज्यांच्याकडे कारपास आहे त्या वाहनांचा पार्किंगकडे जाण्याचा मार्ग देहूरोड एक्टिकडून एक्सप्रेसवे लगतच्या सर्विस स्टेडीयमला व्हीव्हीआयपी व व्हीआयपी पार्किंगकडे
२) पुणेकडून येणाऱ्या व्हीव्हीआयपी व व्हीआयपी ज्यांच्याकडे कारपारा आहे त्या वाहनांचा पार्किंगकडे
जाण्याचा मार्ग
(i) पवना रिव्हर बिजमार्गे किवळे ब्रिजवरुन एनएच-४ अंडरपास मधुन लेफ्ट घेवुन एस्प्रेसवे लगतच्या सर्व्हिस रोडने स्टेडीयमलगतच्या व्हीव्हीआयपी व व्हीआयपी पार्किंगकडे
ii) हँगिंग ब्रिजमार्गे येणारे प्रेक्षक भोंडवे चौक, कृष्णा हॉटेल चौक येथे उजवीकडे वळुन एनएच-४ अंडरपासने पुढे जाऊन डावीकडे वळुन सर्व्हिस रोडने स्टेडीयमलगतच्या व्हीव्हीआयपी व व्हीआयपी पार्किंगकडे.
वाहन पास नसलेल्या प्रेक्षकांकरीता :
१) मुंबईकडुन येणाऱ्या कार पास नसणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंगकडे जाण्याचा मार्ग मुंबईकडुन येणारे प्रेक्षक मुकाई चौकातुन युटर्न घेवून सर्विस रोडने जनरल पार्किंगकडे जातील.
२) पुणेकडुन येणाऱ्या कार पास नसणान्या प्रेक्षकांसाठी पार्किंगकडे जाण्याचा गार्ग: पुणेकडुन येणारे प्रेक्षक पवना रिव्हर ब्रिजवरून किवळे रिव्हर ब्रिजवरुन डावीकडे वळुन सर्व्हिस रोडला पुन्हा डावीकडे यळुन | सिबॉयसिस कॉलेजजवळुन सर्व्हिसरोडने जनरल पार्किंगकडे जातील..
क) दुचाकी वाहनांसाठी पार्किकडे जाण्याचा मार्ग पुणे बाजुकडुन सरळ पवना ब्रिज मार्गे किवळे, मामुर्डी जकात नाक्यापासून डावीकडे वळून दुचाकी पार्किंगकडे जातील. टिप :१) स्टेडीयम परिसरात तिकिट विक्री नसल्यामुळे तिकिट नसलेल्या व्यक्तिनी स्टेडीयमकडे येवून
गर्दी करुन नये.
२) पार्किंग व्यवस्थेव्यतिरिक्त इतरत्र वाहने लावल्यास टोईंग व्हॅनद्वारे उचलून कारवाई करण्यात येईल..