न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२३) :- गेल्या दहा वर्षांपासून पिंपळे सौदागर येथील पीस व्हॅली सहकारी गृहनिर्माण संस्था ही पर्यावरण संरक्षण क्षेत्रात विविध उपक्रम अविरतपणे राबवत आहे. यापूर्वीच्या सर्व कमिटींनी, सोसायटी सदस्यांच्या पूर्ण पाठिंब्याने आणि योगदानाने हे काम हाती घेतले आहे. १०० टक्के मेंटेनन्स संकलन असलेली पीस व्हॅली ही ग्रीन सोसायटी बनण्याच्या मार्गावर अग्रेसित आहे.
या वर्षी हाती घेतलेला आणखी एक मोठा प्रकल्प म्हणजे सोलर पॉवर प्रकल्प बसवणे होय. सोसायटीचे मा. अध्यक्ष हेमंत भदाणे यांनी याची मुहूर्तमेढ रोवली. माजी कोषाध्यक्ष पवन धांडे, मा. सचिव सूरज सदावर्ते आणि मा. अध्यक्ष शलभ अडसुळे यांच्या माजी समितीने तात्काळ या प्रकल्पाला मान्यता दिली. मेहनत केली आणि सर्व अडथळे दूर केले. रहिवाशांनी आर्थिक मदत केली.
माजी सचिव उदय तिबडेवाल, आनंद अग्रवाल यांनी विविध कोटेशन, अंमलबजावणीचा अभ्यास करून या प्रकल्पाचे नेतृत्व केले. शेवटी या प्रकल्पासाठी नॅचरल लाइट एनर्जी सोल्युशन्स या संस्थेची निवड करण्यात आली. रोहित अष्टपुत्रे (अध्यक्ष) आणि अमोल नारखेडे (सचिव) यांच्या नवीन कमिटीने या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा दिला. वेळोवेळी मदत केली आणि काम कधीही थांबणार नाही याबाबत प्रयत्न केले. सोलर पॅनल इन्स्टॉलेशन, महावितरणची मंजुरी आणि शेवटी मीटर कनेक्शन पूर्ण करण्यासाठी ४-५ महिने लागले. अखेर दसरा २४ ऑक्टोबर 2023 रोजी हा प्रकल्प कार्यान्वित झाला. सर्व सोसायटीतील सामूहिक वीज साधनांसाठी हा प्रकल्प आहे. सुमारे ऐंशी टक्के यामुळे वीज बिल वाचेल आणि दरवर्षी १६ लाख रुपयांची बचत होईल. आमचा हा प्रकल्प नक्कीच खूप सारे कार्बन क्रेडिट मिळवून देईन.
मुख्य अतिथी पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघाचे संचालक चारुहास कुलकर्णी आणि महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी दिवाकर देशमुख यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अतिथी पिंपळे सौदागरचे कार्यकारी अभियंता सुजीत ननावरे यांनीही या प्रकल्पा दरम्यान आम्हाला अनेक वेळा मार्गदर्शन केले. नॅचरल लाइट एनर्जी सोल्युशन्सचे संचालक आदित्य केजडीवाल यांनीही रहिवाशांना मार्गदर्शन केले व प्रकल्प कमी वेळात पूर्ण केला . शेजारील सोसाटीतील विविध समितीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी पीस व्हॅली सोसायटीने पूर्ण केलेल्या सर्व प्रकल्पांचे कौतुक केले.
पीस व्हॅली सोसायटी संपूर्णपणे हरित सोसायटी बनण्याच्या या मार्गावर सुरू राहील. खरं तर ,पीस व्हॅली सोसायटी ही अभिमान बाळगू शकते. या अखंड कार्यात पीस व्हॅली सहकारी गृहनिर्माण संस्था समिती अथक परिश्रम घेत आहे.












