न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२३) :- ऑनलाइन कामाची सक्ती रद्द करावी, सानुग्रह अनुदान मिळावे, किमान वेतन मिळावे यांसह अन्य मागण्यांसाठी महापालिका हद्दीतील आशा वर्कर्सनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले.
महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीमार्फत पुकारलेल्या काम बंद आंदोलनात पुण्यातील आशा वर्कर्सही सहभागी झालेल्या आहेत. त्यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले आहे. आशा वर्कस शासनाच्या योजनांचे लिंक वर्कर म्हणून काम करतात. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना दिवाळीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे. आशा वर्कर्सना दिलेली कामे पार पाडण्यासाठी रोज किमान ८-१० तास मोबदला तत्वावर काम करतात. मोबदल्याचे दर अतिशय तुटपुंजे असतात. आशा वर्कर्सना दरमहा अनेक किमान २६ हजार रुपये मानधन मिळावे, अशी मागणीही करण्यात आलेली आहे.
अहवाल व रेकॉर्ड ठेवण्यासाठी आवश्यक स्टेशनरी उपलब्ध करुन दिली पाहिजे. आशा वर्कर्सना कामांसाठी आवश्यक वजन काटा, औषधे आदी साहित्य त्वरीत उपलब्ध करुन द्यावे. आशा वर्कर्सना सन्मानाची वागणूक न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशाराही देण्यात आलेला आहे.
पुणे जिल्हा आशा वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष किरण मोघे, सचिव वसंत पवार यांनी महापालिका आयुक्तांना मागण्यांचे निवेदनही दिले आहे.














