न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२३) :- राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी आणि पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब उर्फ बंडू शिंदे यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती शहराध्यक्ष भाई विशाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. सोबत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान भाई शेख रेल्वे युनियन मजदूर पुणे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ कदम उपस्थित होते.
ओबीसी, एससी, एसटी, एनटी, वीजेएनटी समाजामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कशाप्रकारे निवडून येईल याच्याकडे जास्त लक्ष देण्याचे काम ते करणार आहेत.
नियुक्तीपत्र देत असताना शहराध्यक्ष भाई विशाल जाधव म्हणाले “बाळासाहेब शिंदे हे माझे खूप जुने समाजकारणातील सहकारी मित्र आहेत. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये विविध पदावर काम करत असताना त्यांनी समाजकार्याद्वारे आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. येत्या काळामध्ये ओबीसी एससी एसटी साठी जोमाने काम करतील अशी भावना व्यक्त करत आहे.”














