न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२३) :- महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे जर्मनी देशाच्या दौऱ्यावर सोमवारी (दि. ३०) रात्री रवाना झाले आहेत. तेथे होणाऱ्या शहरी वाहतूक व विकास या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यासाठी ते मंगळवार (दि. ३१) ते ६ नोव्हेंबर (सोमवार) असे सात दिवस रजेवर आहेत.
त्यांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे हे आयुक्तांचे कामकाज सांभाळणार आहेत. राजकीय शिष्टाचार व आपत्ती व्यवस्थापनविषयक महत्त्वाच्या बाबींचे कामकाज पहावे. या कालावधीत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, असे आयुक्त सिंह यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान, आयुक्त रजेवर जाणार असल्याने अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील फाईलवर सह्या करू घेण्यासाठी सोमवारी त्यांच्या दालना तसेच, ऑटो क्लस्टर येथी कार्यालयात गर्दी केली होती. तसेच स्थायी समिती सभा मंगळवारऐवज सोमवारी घेण्यात आली.














