न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत शहर अभियंता या पदास समकक्ष मुख्य अभियंता ही दोन पदे नुकतीच निर्माण करण्यात आली आहेत. त्या पदावर सह शहर अभियंता श्रीकांत सवणे व रामदास तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही पदावर आपली वर्णी लागावी म्हणून काही कार्यकारी अभियंत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.
सवणे व तांबे यांची पदोन्नती झाल्याने सहशहर अभियंता ही दोन पदे रिक्त झाली आहे. सह शहर अभियंता पदाची खुर्ची मिळावी म्हणून काही कार्यकारी अभियंते प्रयत्न करीत आहे. त्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न केले जात आहेत.
अधिक वर्षे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिलेल्या अधिकाऱ्यांची या पदावर नियुक्ती होणार आहे. सहशहर अभियंता म्हणून या रिक्त झालेल्या या दोन पदावर कोणाची नियुक्ती होणार याची पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.