न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह आयुक्त बन्सी गवळी हे मंगळवारी (दि. ३१) निवृत्त झाले. पीएमआरडीएमध्ये ते जवळपास सव्वातीन वर्ष कार्यरत होते.
पीएमआरडीएमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विलीनीकरण होण्यापूर्वी त्यांनी तत्कालीन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. ते प्राधिकरणात १ जुलै २०२० रोजी रुजू झाले होते. प्रशासकीय सेवेमध्ये ते फेब्रुवारी १९९१ मध्ये ठाणे जिल्हा येथे तहसीलदार म्हणून दाखल झाले होते. त्यांची एकूण प्रशासकीय सेवा ३३ वर्ष झाली.
पेठ क्रमांक १२ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना साडेसात लाखांमध्ये घर, नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमआरडीएत झालेले विलीनीकरण. मोशी येथील खुल्या प्रदर्शन केंद्राची निर्मिती, पीएमआरडीएच्या आकृतीबंधाला मंजुरी या महत्त्वपूर्ण बाबी बन्सी गवळी यांच्या कारकिर्दीत घडल्या. पीएमआरडीएच्या आकुर्डी कार्यालयात त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला.