- शहर राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अति. आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२३) :- जमशेठजी टाटा उड्डाणपुल नाशिक फाटाची देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर ओबीसी सेलच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाळासाहेब शिंदे वरिष्ठ उपाध्यक्ष, संतोष माळी भोसरी विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल क्षीरसागर, युवा सुहास कुदळे, प्रतीक बगाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कासारवाडीतील नाशिक फाटा येथील जमशेठजी टाटा उड्डाणपुलाच्या भिंतींवर नैसर्गिकरित्या वड पिंपळ अशा झाड आणि झाडांची मुळ मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वेळोवेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं जात नाही. भविष्यात त्यामुळे पुलाला तडे जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ओबीसी सेलचे शहराध्यक्ष भाई विशाल जाधव यांनी दिला.
” एक जागरूक नागरिक म्हणून आपण सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार. लवकरात लवकर संबंधित विभागाला पत्र व्यवहार करून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कार्यवाही करण्यात येईल”, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले आहे.