- बतावणीला भुलून महिलेने गमाविले स्त्रीधन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२३) :- दोघांनी इशारा करून महिलेला जवळ बोलावून घेतले. त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्या दोघांनी महिलेला ‘ते देवाचे बघतात व भविष्य ही बघतात, तुम्हाला देव प्रसन्न होण्याची शक्यता आहे’ असे भासवले.
दोघांच्या बोलण्यावर महिलेने विश्वास ठेवत गळयातील मणी मंगळसूत्र त्या दोघांना काढून दिले. त्यावेळी त्या दोघांनी महिलेच्या गळयातील मणी मंगळसुत्रावर मंत्र मारल्यासारखे करून पिशवीमध्ये ठेवल्याचा बहाना करीत सत्तर हजार रुपयांचे डोरले व मणी मंगळसुत्र काढुन घेत महिलेची फसवणूक केली.
दिघीतील विठ्ठल रुख्मीणी मंदिराजवळील एका हॉस्पिटलजवळून आंळदी येथील घरी जात असताना (दि. ०२) रोजी १०.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. महिलेने दोन अनोळखी जणांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
दिघी पोलिसांनी ५५६/२०२३ भादवी कलम ४२०, ४०६, ३४ नुसार दोघा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि भदाणे पुढील तपास करीत आहेत.