न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२३) :- ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून अकरा वर्षाखालील मुलांच्या ” चॅम्पिअनस ट्रॉफी ” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
४ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत ऑल स्टार्स ‘अ’ अकॅडमी, ऑल स्टार्स ‘ब’ अकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट ‘ब’ अकॅडमी, आर्यन्स क्रिकेट अकॅडमी, विराग क्रिकेट अकॅडमी स्पेशल XI, ट्रीनीटी क्रिकेट अकॅडमी, कोकाटे क्रिकेट अकॅडमी हे आठ संघ सहभागी होणार आहेत. थेरगाव येथे १२ तारखेला अंतिम सामना होईल, अशी माहिती शादाब शेख यांनी दिली.