न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०६ नोव्हेंबर २०२३) :- सुदुंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल कालिदास गाडे या बहुमताने सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यांनी सहाशेपेक्षा अधिक मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शेळके उमा राहुल यांचा निवडणुकीत पराभव केला आहे. मंगल कालिदास गाडे यांना १२५६ मते तर प्रतिस्पर्धी उमेदवार शेळके उमा राहुल यांना ६५४ मते पडली आहेत.
सुदुंबरे हे मावळ तालुक्यातील एक मोठे गाव म्हणून ओळखले जाते. इथे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या एकूण ११ जागांपैकी १० जागा या बिनविरोध झाल्या होत्या. तर सदस्य पदाची एक जागा निवडणूक अर्ज माघारीनंतर रिक्त राहिली होती. त्यामुळे फक्त सरपंच पदासाठी इथे निवडणूक पार पडली. ज्यात दुरंगी लढत झाली.
प्रत्यक्ष मतमोजणीनंतर गाडे मंगल कालिदास यांना वॉर्ड १ मध्ये ३११, वॉर्ड २ मध्ये ३०२, वॉर्ड ३ मध्ये २१३, वॉर्ड ४ मध्ये ४३० अशी एकूण १२५६ मते पडली., तर शेळके उमा राहुल यांना वॉर्ड १ मध्ये ५३, वॉर्ड २ मध्ये १८९, वॉर्ड ३ मध्ये २९६, वॉर्ड ४ मध्ये ११६ अशी एकूण ६५४ मते पडली.
मावळ तालुक्यात २९ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. ज्यात १९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आणि १० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका होत्या. यात सार्वत्रिक निवडणूका असलेल्या १९ पैकी ४ गावांची निवडणूक बिनविरोध झाल्याने १५ गावांत रविवारी (दि. ५) रोजी मतदान झाले. त्याचा निकाल जाहीर झाला आहे.