न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२३) :- ज्येष्ठांनी आपले अनुभव आमच्या सारख्या नवीन पिढीला सांगावेत, ते आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड यांच्या वतीने वतीने सभासदांचा वाढदिवस समारंभ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शहर संघटक संतोष सौंदणकर व वक्ते अरविंद रोडे हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी व स्वीकृत सदस्य हरिभाऊ क्षीरसागर व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष सौंदणकर यांनी आपल्या भाषणातून सर्व ज्येष्ठ नागरिकांचे कौतुक केले.
अरविंद रोडे यांनी “आनंदाच्या दाही दिशा’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. जीवनात आनंदी कसे राहावे, यावर त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळेस त्यांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनाही सांगितल्या. तसेच कौटुंबिक जीवनात संयम कसा बाळगावा, हेदेखील सांगितले.












