न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाकडून आज मंगळवारी मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेशद्वारावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेश व ओळखपत्रांची तपासणी करण्यात आली.
उप आयुक्त विठ्ठल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासणीत १४ जणांनी ओळखपत्र लावलेले नसल्याचे आढळून आले.












