- युवा नेतृत्व संतोषभाऊ बारणे यांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२३) :- आमदार पै. महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेतृत्व संतोषभाऊ बारणे यांच्या वतीने मोशीत सेलिब्रटी ‘प्रार्थना बेहेरे’ हिच्या उपस्थितीत ‘भव्य मोफत बालजत्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आर. जे. अक्षय कार्यक्रमात अँकरिंग करणार आहेत.
रविवार (दि. २६) रोजी सायंकाळी ५:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत मोशीतील ग्रँड हॉटेल समोरील परिसरात नागरिकांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. या बालजत्रेत सहभागी होण्यासाठी 8307079494, 9284734019 या मोबाईल नंबरवर कॉल न करता व्हाट्सअॅप ला हाय करून नावनोंदणी करता येईल.
कार्यक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी ऑर्केस्ट्रा, मेहंदी व टॅटू फ्री, फायर शो, लहान व मोठ्यांसाठी विविध खेळणे, महिलांसाठी लकी ड्रॉ मध्ये पैठणी, चार्ली चॅप्लिन शॉ, मस्कॉट्स, ठंड मेकर. 360° विडिओ मेकर, फोटो अश्या विविध प्रकारच्या मनोरंजनाचा मोफत लाभ घेता येईल. सर्व नागरिकांनी कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संतोषभाऊ बारणे यांनी केले आहे.













