न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२३) :- शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वामध्ये मोरवाडी ते पिंपरी चौकपर्यंत संविधान रॅली काढण्यात आली. मीडिया प्रमुख यशवंत कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जातीपातीच्या राजकारणात संविधान हेच आपल्याला वाचवू शकते. भारतीय संविधान हा भारताचा आत्मा आहे, असे मत यशवंत कांबळे ह्यांनी मांडले. महासचिव राज चाकणे यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले.
यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, सरोज कदम, संतोषी नायर, स्मिता पवार, सुंदरा ओव्हाळ, कल्याणी चाकणे, गोविंद माळी, सचिन पवार, अजय सिंह, इमरान खान, संजय मोरे, वैजनाथ शिरसाट, राज चाकणे, अशोक तनपुरे, रविराज काळे, राजू वाघमारे, सुनील शिवशरण, राशीद अत्तार, ब्रह्मानंद जाधव, रोहित सरनोबत, स्वप्निल जेवळे, सुरेश भिसे, विशाल कांबळे, चंद्रमुनी जावळे, अभिजीत सूर्यवंशी, प्रशांत कोळवले, शुभम यादव, संतोष बांगर, यशवंत कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.














