न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२३) :- वॉकींग करत असताना आरोपी याने वृद्धाला पोलीस असल्याचे सांगुन “काल येथे अनोळखी व्यक्तीने सकाळी फिरणाऱ्या लोकास मारहाण करुन त्यांचे पैसे व सोन्याचे दागिने चोरी करुन गेले आहेत.” अशी बतावणी केली.
फिर्यादीला विश्वास दाखवुन फिर्यादीकडील ३३,९०० रुपये रोख रक्कम व ५५,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण ८८,९१० रुपयांचा मुददेमाल हात रुमालमध्ये टाकण्यास सांगुन दागिने रुमालसह फसवणुक करुन आरोपी घेवुन गेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.२७) रोजी ९.०० च्या सुमारास एल्प्रो स्कुल समोरील रोडवर, राजपार्क सोसायटीसमोर, चिंचवडगाव येथे घडला. फिर्यादी ताराचंद मांगीलाल शर्मा (वय ७१ वर्षे रा. लिंकरोड, पिंपरी) यांनी हेल्मेट घातलेला युनिकॉर्न मोटारसायकलवरील अनोळखी इसमच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात ५८४/२०२३ भा.दं.वि कलम १७०,४१९,४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












