न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२३) :- खंडणी विरोधी पथक अवैध धंद्यांची माहिती काढत होते. त्यावेळी पोलीसांना “आळंदी, मरकळ रोड, धानोरे फाटा येथील पत्र्याच्या खोलीत एक इसम घरगुती भरलेल्या सिलबंद गॅस सिलेंडर मधुन छोट्या रिकाम्या ४ किलो च्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस अवैधरित्या रिफील करुन त्या विक्री करत आहे,” अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या ठिकाणी दोन तास सर्च ऑपरेशन करुन एका पत्र्याच्या खोलीत सुरु असलेल्या बेकायदेशीर गॅस रिफीलींग करीत असलेल्या ठिकाणी छापा मारला. छाप्यामध्ये आरोपी संदीप नरसिंग लांडगे (वय-२४ वर्षे रा. देवनिवास बिल्डिंग, रुम नं.१, ठाकूरवस्ती, मरकळ रोड, आळंदी), हा मिळून आला. तसेच सदर ठिकाणी ६२,८०० रु किं चा एकुण मुद्देमाल त्यामध्ये ०८ घरगुती वापराचे सिलेंडर, ०१ व्यवसायिक सिलेंडर, १३ लहान गॅस भरलेले सिलेंडर, ३७ रिकामे लहान सिलेंडर, ०५ पितळी रीफीलर नोजल, ०२ गॅस रिफिलिंग सर्किट असे साहित्य मिळून आले. ते जप्त करुन, सदर इसमांविरुध्द आळंदी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३०९/२०२३ भा.दं.वि कलम ४२०,२८५,२८६ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करुन, आरोपीस पुढील कार्यवाहीकामी आळंदी पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, किरण काटकर यांच्या पथकाने केली आहे.