- पिंपरी चिंचवडचा आदिश्री इलेव्हन विजेता तर, वरळेचा नायरा इलेव्हन संघ उपविजेता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२३) :- स्व. प्रशांतदादा जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन व साई ग्रुप देहु यांच्या वतीने श्री क्षेत्र देहू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार चषक-फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा’ बक्षीस वितरण समारंभ देहूत नुकताच पार पडला.
क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते आदिश्री इलेव्हन- पिंपरी-चिंचवड, उपविजेते नायरा इलेव्हन – वराळे हे ठरले. यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल व स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
या समारंभप्रसंगी आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष सुधीर काळोखे, नगरसेवक योगेश काळोखे, प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, बाळासाहेब काळोखे, राजेंद्र काळोखे, दिलीप काळोखे, बेबीताई हगवणे, देहू नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी तसेच आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंचचे सहकारी उपस्थित होते.