- देहू ग्रामस्थांनी उगारले उपोषणाचे हत्यार; सामाजिक संघटनांचा उपोषणाला पाठींबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२३) :- देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील सरकारी गायरान जागा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयास देवू नये, या मागणीसाठी देहू ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी (दि. २८) रोजी उपोषण करण्यात आले.
यावेळी ह.भ.प.पुरषोत्तम महाराज मोरे, प्रकाश किसन काळोखे, ह.भ.प. संजय महाराज मोरे, योगेश काळोखे, योगेश बाळासाहेब परंडवाल, पूजा अमोल दिवटे, प्रकाश गोविंद हगवणे, स्मिता शैलेश चव्हाण, प्रवीण रामदास काळोखे, प्रशांत भागुजी काळोखे, स्वप्निल बाळासाहेब काळोखे, जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू, श्री क्षेत्र देहू नगरपंचायत-नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक, नगरसेविका, जनजागृति सामजिक मंच श्री क्षेत्र देहु आदींनी उपोषणात सहभाग घेतला.
देहू येथे सुमारे दिडशे एकर सरकारी जागा आहे. यापैकी पन्नास एकर जागा पोलिस आयुक्त कार्यालयास देण्यात येणार आहे. यासाठी सरकार पातळीवर हालचाली सुरू आहेत. या निर्णयाला नागरिक विरोध करत आहेत.
हद्द निश्चित करण्यासाठी आलेल्या मोजणी अधिकारी यांना नागरिकांकडून विरोध करण्यात आला. या जागेचा उपयोग देहूच्या विविध उपक्रमांसाठी करण्यात यावा त्यामध्ये पालखी तळ, नगर पंचायत कार्यालय इमारत, क्रीडापण, वाहनतळ व इतर योजना राबवल्या जाणार आहेत. श्री क्षेत्र देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविक-भक्तांच्या राहण्यासाठी व सुख सुविधांसाठी देहूची गायरान जागा आरक्षित ठेवण्यात यावी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थांनचे वर्षभरातील मोठ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी, वारकरी संत विद्यापीठासाठी, जन्मोत्सव सोहळा, तुकाराम बीज, कार्तिकी यात्रा जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा, या निमित्ताने लाखो भाविक येत असतात. त्यांच्या दिंड्यांच्या राहूट्या (तंबु) व वाहनतळासाठी, श्री क्षेत्र देहू येथील सर्व नागरिकांसाठी तसेच देहूमध्ये येणाऱ्या भाविकांना मुलभुत सुविधा करण्यासाठी, भविकांसाठी व नागरिकांसाठी रुग्णालय, जलशुद्धीकरण केंद्रासाठी, महावितरण सब स्टेशनसाठी. घनकचरा व्यवस्थापनासाठी, यात्री वाहनतळासाठी, खेळाच्या क्रीडांगनासाठी, गावजत्रेसाठी, नगरपंचायत प्रशासकीय इमारतीसाठी, अग्निशामक केंद्र उभारणीसाठी, नगरपंचायत शाळेच्या इमारतीसाठी, स्मशानभूमीसाठी या व अशा प्रकारच्या अनेक मुलभुत सुविधा विकासाठी ही जागा भविकांसाठी व नागरिकांसाठी आरक्षित ठेवण्यात यावी इतर शासकीय आणि निमशासकीय संस्थेसाठी जागा देण्यास गावक-यांचा विरोध आहे.