न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२३) :- जेष्ठ नागरीकाच्या तोंडास मिरची पावडर चोळुन, मनी ट्रान्सफरची २७,२५,८०० रुपयांची रोख रक्कम लुटणाच्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
निगडी पोलीस ठाणे गुरनं ६६६/२०२३ भादवि कलम ३९४, ३४ या गुन्हयातील फिर्यादी नामे प्रकाश मिकचंद लोढा, वय ६८ वर्षे, रा. एल आय जी कॉलनी, सिंधुनगर, प्राधिकरण, निगडी, पुणे. हे दिनांक १४/११/२०२३ रोजी रात्रौ २२:४५ वाचे सुमारांस
जाधववाडी, तळवडे, मोरेवस्ती चिखली येथे मनी ट्रान्सफरची एकुण मिळुन २७,२५,८०० रू रोख रक्कम गोळा करून फिर्यादी निगडी येथून (दि. १४) रोजी रात्री १०:४५ चा सुमारास स्कुटरवरून दुर्गानगर चौकाकडुन रहात्या घरी जात असताना, हत्ती चौक ते एल आय सी कॉर्नर दरम्यान, यमुनानगर निगडी येथे पाठीमागुन मोटार सायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी स्कुटरला धक्का देवुन यातील फिर्यादीच्या चेहऱ्यावर मिरची पावडर लावुन, त्यांना जखमी करून, धक्का बुक्की करून, त्यांच्या जवळील रोख रक्कम असलेली पैश्याची सॅक बॅग जबरदस्तीने हिस्कावुन नेली होती. निगडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
पोलिसांनी याप्रकरणी १) विशाल साहेबराव जगताप (वय २५ वर्षे, रा. मोरेवस्ती, चिखली) याला कुरूळी फाटा, पुणे नाशिक हायवे येथुन दरोडा विरोधी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या रक्कमेपैकी त्याचे वाटयास आलेली ८,०१,५०० रू रोख रक्कम हस्तगत केली. २) लालबाबू बाजीलाल जयस्वाल (वय २८ वर्षे धंदा मोबाईल शॉपी रा. टॉवर लाईन चिखली), ३) जावेद अकबर काझी (वय ५० वर्षे किवळे, देहूरोड), ४) अभिषेक दयानंद बोडके (वय १९ वर्षे मोरेवस्ती चिखली) यांना चिखली परिसरातुन शिताफीने ताब्यात घेतले. वरील चारही आरोपींना पुढील कार्यवाही कामी निगडी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तदनंतर सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू ठेवुन, स्थानिक माहितीवरून व तांत्रिक विश्लेषनाच्या तपासावरून संशयीत इसम नामे धिरेंद्र असवाणी सिंग हा मनोज जयस्वाल याचे सतत संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने, आरोपी नामे ५) धिरेंद्र सिंग असवाणी सिंग, वय ३८ वर्षे, रा. संगम हौसिंग सोसायटी, टॉवर लाईन, मोरेवस्ती, चिखली, पुणे यास ताब्यात घेवुन, त्याकडे अधिक तपास केला असता, मनोज जयस्वाल याने त्याच्याकडे १३,००,०००/- रोख रक्कम ठेवली होती. त्यापैकी काही रक्कम त्याने मनोज जयस्वाल याचे सांगणेवरून वेगवेगळया खात्यामध्ये पाठविली. क्रेडीट कार्डचे पैसे भरले, सोसायटीचे लोन भरले, इतर आरोपींचे विमानाचे तिकीट काढले, तसेच सोन्याचे दागिने व ०१ मोबाईल फोन खरेदी केला असे निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपी धिरेंद्र सिंग असवाणी सिंग याने पाठविलेली रक्कमेचे वेगवेगळे खाते गोठविण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे. पुढील तपास निगडी पोलीस ठाणे करीत आहे. अदयाप पर्यत ११,३५,४००/- रोख रक्कम व इतर मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. दाखल गुन्हयातील अटक आरोपी यांनी त्यांचे पाहिजे आरोपी साथीदार यांचेसह फिर्यादी यांचेकडील कामगार मोहन वैद्य यास दोन वेळा लुटण्याचा प्लॅन केला होता परंतु तो अयशस्वी झाला होता.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे -१) बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, संतोष पाटील, सपोनि अंबरिष देशमुख, पो. उपनि इम्रान शेख, भरत गोसावी, गणेश माने, तसेच दरोडा विरोधी पथक, युनिट १, २, ३, ४, खंडणी विरोधी पथक व तांत्रिक विश्लेषन विभागातील अंमलदार यांनी केली आहे.