- एसटीची सवलतीच्या दरात विना वातानुकुलीत स्लीपर बस असेल दिमतीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२३) :- शेगावचे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांना पुण्यातून एसटीची सवलतीच्या दरात विना वातानुकुलीत स्लीपर बस पुणे – शेगाव सूरू करण्यात आली आहे.
मंगळवार (दि. ०५) डिसेंबर पासून राज्य परिवहन मंडळाने शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्थानकातून पुणे -शेगाव- पुणे विना वातानुकुलीत स्लीपर (शयनयान) बस सेवा चालू करण्यात आली आहे.
सदरची बस शिवाजीनगर आगार वाकडेवाडी येथून रात्री २१.०० वा. निघणार आहे.व दुसऱ्या दिवशी ०७.०० वा.शेगाव येथे पोचणार आहे. यासाठी प्रत्येक प्रवाश्यास रु.९९० एवढे भाडे असून सदर बस करीता सर्व सवलती लागू असतील. तसेच सदर सेवा हि आरक्षण प्रणालीसाठी एसजीएन या सांकेतिक कोड नुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर व इतर संकेतस्थळा वरून देखील आरक्षण करता येईल. सदर सेवा हि अल्प दरात असून प्रवाश्यांनी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर रणवरे आगार व्यवस्थापक शिवाजीनगर आगार यांनी केले आहे.












