- फेरीवाले सर्वेक्षण आणि पथविक्रेता धोरण निश्चितील वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०७ डिसेंबर २०२३) :- देहू नगरपंचायतीच्या हद्दीत प्रथमच देहू शहर पथविक्रेता समितीची देहू नगरपंचायत प्रशासनाने स्थापना केली आहे. या समितीद्वारे फेरीवाले सर्वेक्षण आणि पथविक्रेता धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
देहूची लोकसंख्या शहरीकरण आणि भाविकांमुळे वाढ झाली आहे. त्यामुळे पथविक्रेते यांच्या संख्या देखील वाढलेली आहे. त्यामुळे वाहतूक
कोंडी होत आहे. यावर उपाय करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली.
यात मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस अधिकारी, शहर अभियंता, वैद्यकीय अधिकारी, बँक अधिकारी पदसिद्ध अधिकारी आहेत. व्यापारी आणि पणन यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आहेत. सामाजिक संस्थांच्या दोन आणि पथविक्रेते यांचे आठ प्रतिनिधी समितीत आहेत.












