न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२३) :- तळवडेत आज शुक्रवारी (दि. ८) रोजी दुपारच्या सुमारास स्पार्कल्सच्या कंपनीत आग लागली. यामध्ये सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग एवढी भीषण होती की त्यामध्ये सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
आत्तापर्यंत सहा मृतदेह मिळाले आहेत. जखमींची संख्याही मोठी आहे. अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. मृतदेह हलविण्यात आले. कामगारांचा शोध सुरु आहे. वाढदिवसाल्या लावण्यात येणाऱ्या स्पार्कल्सचा हा कारखाना होता.
घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच मुख्य रहदारीच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.












