न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२३) :- कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकातील लूप (रॅम्प) या महिन्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र दिले आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर सर्व लूप सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली.
जागतिक बँकेचे कर्ज घेऊन महापालिकेने चौकात उद्योजक जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुल बांधला आहे. कासारवाडीएल चढण्यासाठी आणि पिंपरीच्या दिशेने उतरण्यासाठी रॅम्प तसेच, पिंपळे गुरव व भोसरी पुलावरून चौकात उतरण्यासाठी लूप बांधला आहे. लूपसाठी सुमारे १० कोटीचा खर्च झाला आहे. वाहतूक पोलिसांनी परवानगी न दिल्याने गेल्या दहावर्षांपासून हा लूप बंद स्थितीत आहे. मेट्रोचे पूर्ण झाल्याने लूप वाहतुकीस खुला करण्यात आहे.
त्यासंदर्भात वाहतूक पोलिसांना महापालिकेने पत्र पाठविले आहे. परवानगी मिळाल्यानंतर तातडीने हा लूप वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी सिग्रलचा खांब, सूचनाफलक व दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत, असे ओंभासे यांनी सांगितले.












