न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १५ एप्रिल) :- मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. या समर्थांच्या वचनानुसार ज्याप्रमाणे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मोट बांधली व पुढे औरंगजेबा विरूध्दात मराठ्यांनी निकराचा लढा देऊन गनीमांना पळता भुई थोडी केली. मात्र, आता मराठी माणसांमध्ये त्या पध्दतीची एकजूट पहायला मिळत नाही. परिणामी बाहेरून येणार्या परप्रांतीयांचे फावले आहे. यामुऴे मराठी माणसाच्या रोजगारीवर मोठ्या प्रमाणात गडांतर येत असून, मराठी तरूण देशोधडीला लागत आहे. आता ही वेळ झोपण्याची नाही, असे भावनिक आवाहन मराठी एकीकरण व विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार छायाताई सोळंके-जगदाळे यांनी केले आहे.
आज मराठी माणसाकडे नोकऱ्या नाहीत, व्यावसाय नाहीत, हाताला काम नाही, काम नाही म्हनून खिशात दाम नाही. आज अनेकांनी महाराष्ट्रातील भुमिपुत्रांचे हक्क हिरावुन घेतले आहेत. आज मराठी माणसाला विकासाच्या गोंढस नावाखाली शहरातुन हद्दपार करण्याचा डाव काही परभाषिक मंडळी गुप्तपणे करत आहेत. मराठी माणूस जर एक झाला तर काय बिशाद आहे, या उपर्यांची महाराष्ट्रात, आपल्या शहरात मुजोरी करण्याची. यावर तोडगा म्हणून मराठी माणसांनी संघठीत व्हावे. परप्रांतीयांना डोके वर काढू देऊ नका. यासाठी आपण सर्वजण एक व्हावे. अन्यथा मराठी माणसांसाठी भविष्यकाळ अतिशय खडतर आणि दारिद्रपणाचा असेल.
छायाताई सोळंके-जगदाळे या ३६-शिरुर मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यांचा मुकाबला शिवसेनेचे तगडे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, तसेच राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्याशी होणार आहे. त्यामुळे मराठी माणसांनी तरी किमान एकजूट दाखवून आपल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एक व्हावे. आपली ताकद या निमित्त दाखवून द्यावी, असेही छायाताई म्हणाल्या.











