न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल) :- शिक्षणाच्या माध्यमातुन स्त्री उद्धाराकरिता अतोनात हाल सोसलेल्या महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या विचारांना आपल्या कार्यातून प्रत्यक्षात आण्याचा प्रयत्न म्हणजे युग प्रवर्तकाला खरी आदरांजली ठरेल, अशी भावना रुजवण्यासाठी चिंचवडेनगरमध्ये ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.
सावता परिषद महाराष्ट्र राज्य, महाराज ग्रुप गडसंवर्धन आणि महेश्वर युवा प्रतिष्ठाण यांच्या वतीने पिंपरी येथील महात्मा फुले स्मारक येथून ज्योत आण्यात आली. तसेच उमेश ताजने आणि आकाश नाळे यांच्या नियोजनात ढोल-ताशा पथकच्या गजरात उत्साहात मिरवणुक काढण्यात आली होती.
महेश्वर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष चेतन वाघमारे, महाराज ग्रुप गडसंवर्धन संस्थापक अक्षय नाळे यांनी सर्वांचे आभार मानले. महादेव वाघमारे, सोमनाथ वाघमारे यांनी ज्योत प्रारंभ केली.
महेश नाळे, संतोषजी राजगुरू, हेमंत डांगे, प्रिया राजगुरू, अनिकेत प्रभू, हनुमंत माळी यांनी शुभेच्छा दिल्या. तर प्रज्वल राऊत, युवराज चिंचवडे, अजित चिंचवडे, अनुज गायकवाड, प्रदीप वाघमारे, कुंडलिक जाधव, भगवान वाघमारे, वासुदेव वाघमारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.











