न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १४. एप्रिल. २०१९) :- तापकीरनगर परिसरातील ‘काका’ज इंटरनॅशनल स्कुलच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानेश्वर हनुमंत तापकीर (प्रगतशील शेतकरी) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
यावेळी नवीन तापकीर, स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर, निलेश तापकीर, अमोल देवकर, हर्षल तापकीर, रविराज तापकीर, विराज तापकीर, गणेश भोसले, निखिल जाधव, अनिकेत शेलार आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील तापकीरनगर येथे ”काकाज इंटरनॅशनल स्कुल – नेक्स्ट एज्युकेशन रोडवाय टू बेटर फ्युचर” या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ‘नो डोनेशन’ या तत्वावर परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. शाळेत नवीन सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम आहे. परिसरातील नागरिकांनी आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहनही शाळेचे संस्थापक नवीन तापकीर यांनी केले आहे.











