न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२३) :- संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सांगवीत रविवारी (दि. १०) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १७१ निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्त संकलन करण्याचे कार्य केले.
शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रमुख) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. मिशनचे गिरीधारीलाल मतनानी (संयोजक पिंपरी) तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या १५ दिवसांपासून समाजामध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी मिशनच्या सेवादारांनी सांगवी परिसरामध्ये रॅलीच्या माध्यमातून तसेच घराघरामध्ये जाऊन जनजागृती केली. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले. आलेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे आभार सांगवी ब्रांच प्रमुख दत्तात्रय शेळके यांनी मानले.


















