न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. १५ एप्रिल) :- ह्युमन राईटस संघटनेच्या वतीने पिंपळे गूरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान, व आठवडी बाजारात, तसेच कृष्णा चौक व इतर उपनगरात कवींनी कवितेतून मतदान जनजागृती केली. यामध्ये प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर याना १२८ व्या जयंती निमित्त अभिवादन करुन भित्तीपत्रके, पटनाटयद्धारे, घोषवाक्येद्धारे, स्पीकरद्धारे, कवितेतून, जनजागृती करण्यात आली.
संविधानाने दिलेल्या अधिकार व कर्तव्यासाठी तसेच देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. त्यामुळे आपल्या परीसराची जाण व नागरी समस्या जाणुन घेणारे अभ्यासू प्रतिनिधी निवडून दिले जातील व आपल्या नागरी समस्या संसदेत मांडल्या जातील.
जनजागृती मध्ये नागरिकांना आव्हान करण्यात आले की आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका, मतदान सर्वश्रेष्ठ काम, घ्या मातृभुमीची आण, करा मतदान, आपलं मत विकासाला मत, तुम हो महान करके मतदान, ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावर, मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मतदानाची किंमत नाही घेणार पण मतदान मात्र जरूर करणार, अशा विविध प्रकारचे घोषणेद्धारे, भित्तिपत्रकाद्धारे, रँलीद्धारे, स्पीकरद्धारे कवींनी कवितेतून नागरीकांना आव्हान करण्यात आले. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या, मिरवणुकीत, व कार्यक्रमात देखील पत्रके वाटुन जनजागृती केली.
आपल्याला शासनाने दिलेल्या सुट्टीचा उपयोग फिरण्यासाठी,व मौज मजा करण्यासाठी न करता राष्ट्रीय कर्तव्य समजून भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आव्हान मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती चे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी केले.
कवी सुहास घूमरे यांनी,”तुमच्या मताला किंमत असते, घटनेनेत तुम्हाला दिलेली हिम्मत असते, मत म्हणजे मूक अभिव्यत्तीही असते, हिच तर लोकशाही ची शक्ति असते” तर कवी शरद शेजवळ यांनी,”दानामध्ये दान महान, मतदान श्रेष्ठ दान, मतदान कर मतदारा, दान कर दान घटनेचा ठेवूनी मान, तू देई योगदान.











