न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०३ ऑगस्ट २०२६) :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त “साहित्यरत्न दौड २०२६ “सार्वजनिक मॅरेथॉन उपक्रमामध्ये प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या ८६ एसपीओ पोलीस मित्रांनी प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त केला तसेच मॅरेथॉन मार्गावर धावपटूंना सुरळीत धावण्यासाठी वाहतूक नियोजन केले. बर्ड व्हॅली चौक पासून सुरू मॅरेथॉन तिथेच माघारी येऊन पुन्हा समाप्त करण्यात आली. मॅरेथॉन मध्ये शहरातील मोठ्या संख्येने धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. ह्या उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन आमदार अमित गोरखे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, वाहतूक पोलीस निरीक्षक निता गायकवाड, उमेश विसपुते, समिती अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
या संदर्भात आमदार अमित गोरखे म्हणाले,” प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या विशेष पोलिस अधिकाऱ्यांचे कार्य गेले अनेक वर्षांपासून पहात आहे. सार्वजनिक उपक्रमामध्ये त्यांनी केलेले सहकार्य नेहमीच कौतुकास्पद असते.आज पहाटे ५ वाजेपासून त्यांनी केलेल्या बंदोबस्तामुळे साहित्यरत्न मॅरेथॉन सुरळीत पार पडण्यास मोलाची मदत झाली.”
पीएनएसकेएस संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,” संस्थेचे स्वयंसेवक,एसपीओ हे शहरातील महत्वाच्या मॅरेथॉन स्पर्धांसाठी विविध संस्थाना दरवर्षी सहकार्य करत आहेत. लोकशाहीर समाजरत्नअण्णाभाऊ साठे यांच्या जयंयीनिमित आज शहरात संपन्न होत असलेल्या एकमेव मॅरेथॉन स्पर्धेसाठी संस्थेचे पदाधिकारी पोलीस मित्र हे पहाटेपासूनच प्रमुख रस्त्यावर योग्य नियोजन करत होते.”
“साहित्यरत्न दौड २०२६” हया सार्वजनिक उपक्रमासाठी विभागीय अध्यक्ष राम सुर्वे, रवींद्र जांभळे,शिल्पा हेरलगी, तेजस सकट, संजय गोरखा प्रमुख म्हणून काम केले.


















