न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२३) :- आशीर्वाद आणि भंडारा देण्याच्या बहाण्याने जवळ बोलवून तीन भोंदू साधूंनी युवकाच्या हातातील चोवीस हजार रुपये किंमतीची अंगठी लांबविली.
ही घटना गुरुवारी (दि. १४) रोजी परांडेनगर, दिघीत घडली. याप्रकरणी कुमार पंडीत पवार यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन नागासाधू विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













