न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२३) :- रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर पवार यांच्या हकालपट्टीचा निर्णय काल झालेल्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला. संघटनेच्या ध्येय्य धोरणा प्रमाणे काम करत नसल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले. त्यानुसार हकालपट्टीचे पत्रक संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे यांनी काढले.
सागर पवार यांना वेळोवेळी दक्षता घेण्यास सांगितले होते. परंतु, त्यांच्याकडून दुर्लक्ष केले. अनेक नागरिकांनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्यामुळे आणि त्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
सागर पवार यांच्या सहीने केलेल्या निवडसुद्धा बरखास्त करण्यात येत आहेत, असे सरचिटणीस रविराज काळे म्हणाले. सागर पवार यांनी संघटनेचे पद यापुढे वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.













