न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२३) :- क्रिकेट खेळत असताना फिर्यादीचा भाऊ आकाश बनसोडे याने काहीतरी बोलुन शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन आरोपी यांचे त्याच्याबरोबर भांडण झाले. फिर्यादीच्या भावास आरोपी १ व २ या दोघांनी कोयत्याने व आरोपी ३ व विधीसंघर्षित बालक ४ यांनी लाकडी दांडक्याने आकाशच्या डोक्यावर, हातावर चेह-यावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले.
फिर्यादीचा भाऊ आकाश तेथून पळत एकाच्या घरासमोर जावुन पडला असताना आरोपी त्याच्या मागे पळत जावुन तेथेही त्याचेवर कोयत्याने व लाकडी दांडक्याने वार करुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. १६) रोजी दुपारी ४.३० वा. ते ५.०० वा. चे दरम्यान नाणेकरवाडी, जंबुकरवस्ती येथील कशल स्वर्नाली साईटच्या कच्च्या रोडजवळ घडला.
फिर्यादी सागर बापु बनसोडे याने आरोपी १) प्रथमेस ऊर्फ प्रशांत बाळु फड, २) सम्यक दिलीप गणवीर, ३) भिमराज मास्ती कांबळे (सर्व रा. जंबुकर वस्ती, नाणेकरवाडी चाकण) व एक विधीसंघर्षित बालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी चौघांच्या विरोधात १०६६/२०२३ भादवि कलम ३०२,३४ व भा.ह.का क ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोनि मुलानी पुढील तपास करीत आहेत.