न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल) :- स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लूच्या केसेस पुन्हा समोर येत आहेत. पिंपरी -चिंचवड शहरामध्ये शनिवारी (दि. १३) रोजी एक बाधित तर एक स्वाईन फ्लू सदृश्य रुग्ण आढळला.
सध्या ढगाळ वातावरण, कडक ऊन या वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लू आणखीन सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वाईन फ्लूचा धोका वाढत आहे. यामुळे संशयित रुग्ण आणि बाधित रुग्णांच्या आकडेवारीत देखील वाढ होताना दिसत आहे. आत्तापर्यंत स्वाईन फ्लूचे १३ बाधित रुग्ण आढळले आहेत.
स्वाईन फ्लूची कोणतीही लक्षणे दोन किंवा तीन दिवस अधिक टिकून राहिली, तर त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत असा, सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.