न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०१९) :- भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्नी सौ. कल्पनाताई आढळराव पाटील यांनी आज सोमवार (दि. १५) रोजी प्रचार दौऱ्यानिमित्त ओटा स्कीम परिसराला भेट दिली.
परिसरातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात सौ. आढळराव यांचे स्वागत केले. याप्रसंगी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, सतीश भांडेकर, सोनम राऊत, अभिजीत जाधव, राधा पुंडे, सतिष उजगरे, सनी भांडेकर, वनिता भांडेकर, मंगल बंदपट्टे, सिकंदर हिरनाईक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ. आढळराव यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खा. आढळराव प्रयत्नशील आहेत. तसेच त्यांनी परिसरात विविध विकासकामे केली आहेत. त्या विकासकामांच्या जोरावर आपण खा. आढळराव यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहनही सौ. आढळराव यांनी यावेळी नागरिकांना केले आहे.