न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी अस्थापनेवर शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) म्हणून १ वर्ष कालावधी करीता सन २०२३-२०२४ साठी व्यवसाय निहाय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी (apprentice) नेमणूक आदेश व प्रतिक्षा यादी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर (मुख्य पृष्ठ – आमच्याबद्दल – नोकरीविषयक – शिकाऊ उमेदवार नेमणूक सन २०२३-२४ प्रशिक्षणार्थी नेमणूक आदेश ) पिंपरी चिंचवड मनपाच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत दिनांक २२/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना नेमणूक आदेश दिनांकाच्या १० दिवसाचे आत नियुक्ती प्राधिकारी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी यांचे कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी कार्यालयीन वेळेत उपस्थित / हजर राहणे बंधनकारक राहील.
नंतर उपस्थित राहणा-या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून कोणताही विचार केला जाणार नाही व त्यांचे जागी प्रतिक्षा यादीतील उमेदवाराची पुढील कार्यवाहीकामी नेमणूक करण्यात येईल, याची स्पष्ट नोंद घ्यावी.











