न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२३) :- मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात आज शुक्रवारी दुपारी अपघात झाला. बोगद्यात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने गाडी अचानक थांबली.
त्यापाठोपाठ चार गाड्या तिच्यावर आदळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात शुक्रवारी दुपारी दुरुस्तीचे काम सुरू होते.
त्यावेळी साताऱ्याकडून पुण्याकडे निघालेली गाडी अचानक थांबली. त्यापाठोपाठ पाठीमागून येणाऱ्या गाड्या आदळल्या. अपघातात गाड्यांचे नुकसान झाले.


















