न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२४) :- टेम्पो भरधाव वेगाने बेदरकारपणे चालवला. त्यात जनावरं वाहतूकीचा कोणताही परवाना नसताना तीन गोवंश जातीची गाय व दोन वासरे यांना अत्यंत निदर्यतेने दोरीने बांधून त्याची वाहतूक केली.
कोणत्याही प्रकारच्या चा-याची व पाण्याची सोय न करता मार्केट यार्ड येथे कत्तलीकरिता जनावरांची विक्री करण्यासाठी घेवून जाताना आरोपी तिघेजण निदर्शनास आले. तसेच स्वत:जवळ विनापरवना कोयता बाळगताना मिळून आले आहेत.
हा प्रकार (दि.३१/१२/२०२३) दत्तनगर बसस्टॉप, दिघी ते कासेवाडी पोलीस चौकी शेजारील झोपडपट्टी, खडक पुणे च्या दरम्यान घडला. आरोपी परवेज बिलाल कुरेशी, तबरेज बिलाल कुरेशी, राहुल यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात ७०४/२०२३ भादवि कलम २७९, ३४, महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९५५ चे कलम ५ अ, ब,९, प्राण्यांना क्रुरतेने वागवणे अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (अ) (ड) (ई) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोउपनि कटपाळे पुढील तपास करीत आहेत.















