न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२३) :- ‘ज्ञानबा तुकाराम’ या वर्षिकाचा ” संत तुकाराम महाराजांचे १४ टाळकरी ” या डॉ. श्रीरंग गायकवाड संपादित विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रतीशिर्डी शिरगाव येथे नुकतेच संपन्न झाले.
याप्रसंगी ह. भ. प. माणिक महाराज मोरे विश्वस्त देहू संस्थान, संत तुकाराम महाराज यांचे अभंग गाथा लेखक आणि प्रमुख टाळकरी संत संताजी जगनाडे महाराज संस्थानचे मुख्य चिटणीस ॲड. राजेश केशवराव येवले, ह.भ. प. निलेश महाराज कबीर, मा. आ. प्रकाश देवळे (अध्यक्ष, साईबाबा ट्रस्ट शिरगाव) आणि डॉ. श्रीरंग गायकवाड उपस्थित होते.


















