न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२४) :- देहू नगरपंचायतीची नवीन पाणी योजना सुरू करण्यासाठी जागा ठराव सोमवारी (दि. ८) झालेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा पूजा दिवटे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याधिकारी निवेदिता घार्गे व इतर उपस्थित होते.
देहू नगरपंचायतीच्या हद्दीत दिवसेंदिवस नागरीकरण झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर २०५१ मधील लोकसंख्या सुमारे एक लाख असेल. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन पाणी योजना करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी इंद्रायणी नदीच्या खालुंब्रे येथील बंधाऱ्याजवळ पाणी उपसा केंद्र बनविण्यात येणार आहे. त्यासाठी जागा ठराव आजच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला. नवीन पाणी योजनेमुळे गाथा मंदिर परिसरात पाणी योजनेचा उपयोग होणार आहे. देहू नगरपंचायतीचा डीपी प्लॅन तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवण्यात आला. मार्च महिन्यानंतर महिन्यानंतर प्लॅन पुन्हा नव्याने सादर करण्यात येणार आहे.