न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२४) :- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २९ फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यात ईव्हीएम प्रात्यक्षिक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत पिंपरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाचे मतदार नोदणी अधिकारी (evm master trainer), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी प्रत्येक प्रभागात प्रात्यक्षिकाचे फलक लावून मतदान जनजागृती करीत आहेत. निवडणूक विभागाचे मतदार नोदणी अधिकारी खोमणे, सोनवणे, जंगम, मुंडे आदी परिश्रम घेत आहेत.
मतदारांना प्रत्यक्ष ईव्हीम मशीनवर मतदान कसे केले जाते?. मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान कोणाला केले? याची प्रत्यक्ष पावती नागरिकांना दाखविली जाते. तसेच मतदारांच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे.