- डेक्कन क्वीनच्या इंजिनवर चढून रेल प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी..
- रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 12 जानेवारी 2023) :- लोणावळा रेल्वे स्थानकात स्थानिक नागरिकांनी हातात विविध मागण्यांचे होर्डिंग घेऊन मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे एक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडले आहे.
डेक्कन क्वीन च्या इंजिन वर चढून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली. लोणावळ्यातील नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात तसेच बंद केलेल्या लोकल पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील केली आहे.
पुणे मुंबई डेक्कन क्वीन ही सुमारे वीस मिनिटं लोणावळा रेल्वे स्थानकात रोखली गेली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून पुणे मुंबई डेक्कन क्वीन मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.
लोणावळा रेल्वे स्थानकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.