न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०१९) :- “सर्वच स्तरात अपयशी हे सरकार आज सैनिकांचे भांडवल करत व नेत्यांवर वैयक्तिक टिका करत स्वत: चे अपयश लपवण्याचे प्रयत्न करत आहे. यांनी आजवर धर्माच्या नावावर मते घेत लोकशाही व संविधानाविरोधी काम केले. आता जनता या निवडणुकीत धर्मांध शक्तींना रोखण्याचे काम निश्चितपणे करेल”, असा विश्वास पत्रकार परिषदेत राज्य अल्पसंख्यक आयोगाचे माजी चेअरमन व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम यांनी व्यक्त केला.
आज बुधवार (दि. १७ एप्रिल) रोजी शहर युवक काँग्रेस व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे व शहरातील अल्पसंख्यांक पदाधिका-यांच्या बैठीकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार परिषदेनतंर श्री.मुनाफ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी हाजी जाकीर शेख (सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), अशोक मोरे (अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभाग), मनोज कांबळे (मा. प्रदेशाध्यक्ष एन एस यु आय), नरेंद्र बनसोडे (शहराध्यक्ष पिं. चिं. युवक काँग्रेस), माजी नगरसेवक अख्तार चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, निगार बारस्कर, युवक काँग्रेसचे पिंपरी अध्यक्ष हिराचंद जाधव, युवक काँग्रेसचे भोसरी अध्यक्ष नासीर चौधरी, पिं. चिं. काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष अशोक मंगल, उमेश बनसोडे, अमर नाणेकर, रशीद सिद्दीकी, अनिल सोनकांबळे, करण गील, मिंलिद बनसोडे, युसुफ पठाण, सैज्जाद शेख, सोनू सिद्दीकी,रोहन वाघमारे, अन्वर पठाण, युनुस खान, अब्दुल शेख, नितीन खोजेकर, मेहबूब शेख, समीर मुल्ला आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











