न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०१९) :- थेरगाव परिसरातील तापकीर चौक येथील अनुसया मंगल कार्यालयाजवळील पाण्याच्या टाकीशेजारी प्लॅस्टिक पाईपच्या गोदामास आज बुधवार (दि. १७) रोजी सायंकाळी अचानक आग लागली.
मोकळा कचरा पेटवल्याने शेजारीच असलेल्या पाईपच्या गोडाऊनपर्यंत आग पसरली व आवारातील उघड्या पाईपच्या गट्टूस आग लागली. पाईप हा पॉलिथिनील प्रकारचा व ज्वलनशील असल्यामुळे लगेचच आगीने रौद्र रूप धारण केले व क्षणार्धात आवारातील सर्व पाईप आगीच्या भक्षस्थानी सापडले.

महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसान मात्र, झाले आहे.











