- मोदी, शहा यांच्यासोबतच खासदार आढळराव, बारणे का नकोत? मनसैनिक करणार उलगडा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०१९) :- भाजप-शिवसेना महायुतीचे मावळातील श्रीरंग बारणे आणि शिरुरमधील शिवाजीराव आढळराव या उमेदवारांच्या विरोधातील प्रचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज बुधवार (दि. १७ एप्रिल) रोजी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी चिंचवड प्रभारी, रणजीत शिरोळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक चौकात प्रचारासाठी एलएडी व्हॅन मनसैनिकांच्या दिमतीला असणार आहे. मनसैनिक घरोघरी जाऊन, उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात हाक दिली आहे.
त्यानुसार पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मनसैनिक कामाला लागले आहेत. मोदी, शहा यांच्यासोबत खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे का नको आहेत? हे मनसैनिक जनतेला समजावून सांगणार आहेत. मोदी यांचा खोटेपणा जनतेसमोर आणला जाणार आहे, असे मनसे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, उपशहराध्यक्ष चंद्रकांत दानवले, राजू सावळे, शहर सचिव रूपेश पटेकर, विभाग अध्यक्ष विशाल मानकरी, मयुर चिंचवडे, संजय यादव, संघटक सुशांत साळवी, विष्णु चावरिया, उपविभाग अध्यक्ष सचिन मिरपगार, अक्षय करांडे, तेजस दाते, अजय कूदळे, मिलिंद सोनवणे, सुरेश सकट, नीलेश नेटके, प्रभाग अध्यक्ष रवि जाधव, सुरज जाधव, राजेश अवसरे, कौस्तुभ देशमुख, प्रतीक शिंदे, गणेश वाघमारे, विक्की कांबळे, अमोल करे, अक्षय खामकर, शिशिर महाबळेश्वरकर, महिला सेनेच्या स्नेहल बांगर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, रुपा गिलबिले, सुजाता काटे, सुनीता माळवदकर, मुमताज शेख, शोभा चावरिया तसेच मनसे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.











