न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहा पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शनिवारी (दि. १३) बदल्यांचे आदेश काढले आहेत.
बदल्या झालेल्या उपायुक्तांची नावे आणि त्यापुढील कंसात कुठून कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे…
संदीप डोईफोडे (पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 ते पोलीस उपायुक्त गुन्हे), डॉ. काकासाहेब डोळे (पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 ते पोलीस उपायुक्त मुख्यालय, अतिरिक्त कार्यभार पोलीस उपायुक्त, विशेष शाखा), विवेक पाटील (पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ते पोलीस उपायुक्त, वाहतुक शाखा), स्वप्ना गोरे (पोलीस उपायुक्त, मुख्यालय/गुन्हे ते पोलीस उपायुक्त परिमंडळ -1), डॉ. शिवाजी पवार (पोलीस उपायुक्त, विशेष शाखा ते पोलीस उपायुक्त, परिमंडळ -3),
बापु बांगर (पोलीस उपायुक्त, वाहतुक विभाग ते पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2).
सर्व पोलीस उपायुक्तांनी पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित कार्यभाग स्वीकारून अनुपालन अहवाल पोलीस आयुक्त कार्यालयास सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत.