- मा. सभापती विलास मडिगेरी यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२४) :- श्री साई चौक मित्र मंडळाच्या वतीने इंद्रायणीनगर भोसरी येथील वैष्णोमाता मंदिरात शुक्रवारी (दि. १९) रोजी दुर्गाष्टमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसह हभप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. गुरुवारी (दि. १८) महाप्रसाद आणि सकाळी ९ ते १२ रोजी दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. तसेच दुपारी दोन ते सायंकाळी साडे सहा वाजता हळदी कुंकू कार्यक्रम होणार आहे.
मंडळाच्या वतीने दरवर्षी सार्वजनिक दुगाष्टमी उत्सवानिमित्त सांस्कृतिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा या उत्सवाचे १८ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप उपस्थित राहणार आहेत.
श्री साई चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, कार्याध्यक्ष विलास भांबुर्डेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.














