न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २३ जानेवारी २०२४) :- अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, संदीप चिलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र सुदुंबरेतील श्री संत संताजी महाराज जगनाडे मुख्य मंदिराची साफसफाई करण्यात आली.
तसेच भगव्या पताका आणि झेंडे मंदिर परिसरात लावण्यात आले. श्रीराम व संताजी महाराजांचे पूजन आणि आरती करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर तेली समाजाचे अध्यक्ष शिवराज शेलार, अतुल शेजवळ, संतोष साखरे, सचिन काळे, अमित शिंदे, संतोष काळे, चंद्रकांत जाधव, कु. आशिष लोखंडे आदी समाज बांधव उपस्थित होते.











