न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्यानिमित्त महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक वसीम कुरेशी, मंगेश टिळेकर, संजय शिंदे, बाळू ओझरकर उपस्थित होते.











